“हक्काची वहीनी”म्हणून सावंतवाडीकर पाठीशी राहतील…

2

अन्नपुर्णा कोरगावकर यांचा विश्वास;मतदारांकडुन भरघोस प्रतिसाद…

सावंतवाडी ता.२३: गेली अनेक वर्षे सावंतवाडी शहरातील नागरिकांसाठी आपण विविध उपक्रम राबवले आहेत.त्यामुळे या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीत सावंतवाडीकर “हक्काच्या वहिनी”च्या पाठीशी ठामपणे उभे राहतील,त्यामुळे माझा विजय निश्चित आहे,असा दावा विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष तसेच अपक्ष उमेदवार सौ.अन्नपूर्णा कोरगावकर यांनी केला आहे.सावंतवाडीकरांची गेली अनेक वर्षे माजी नाळ जोडलेली आहे.आपण महिला सबलीकरणासाठी,आरोग्यासाठी, युवकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी आजपर्यंत विविध उपक्रम राबवले त्यामुळे सावंतवाडीकर मला निश्चितच विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सौ कोरगावकर यांनी आपल्या प्रचाराचा धडाका सुरू केला तळागाळात तसेच वार्डा वार्डात जाऊन त्यांनी आपल्या कामाची पोचपावती म्हणून आपल्याला मतदान करा अशी भावनिक साथ मतदारांना घालण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्या हाकेला मोठा
प्रतिसाद मिळत असल्याचा लावा कोरगावकर यांनी केला आहे. आपल्याला अनेक लोकांनी तुमच्यासारख्या सुशिक्षित व होतकरू उमेदवार निवडून यायला हवा असे सांगितले त्यामुळे निश्चितच अपक्ष उमेदवार असले तरी आपला विजय निश्चित आहे असे कोरगावकर यांचे म्हणणे आहे

4