वैभववाडी.ता,२३: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नंबर १ या प्रशालेतील मुले मुंबई दर्शन या शैक्षणिक सहलीमध्ये सहभागी होणार आहेत. शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात नेहमी अव्वलस्थानी राहिलेल्या या प्रशालेतील मुलांसाठी सांगुळवाडी ग्रामस्थ विद्या प्रसारक संघ मुंबई यांनी मुंबई दर्शन ची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबईची ओळख असलेल्या विविध पर्यटन स्थळे व ऐतिहासिक वास्तू, स्थळांना ही मुले भेट देणार आहेत, बुधवार दिनांक २५ ते २६ डिसेंबर या कालावधीत ही सहल आयोजित करण्यात आली आहे.
वरळी नेहरू तारांगण सेंटर, तारापोरवाला मत्स्यालय, गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, राणीबाग भायखळा, सिद्धिविनायक मंदिर दर्शन या ठिकाणी मुले भेटी देणार आहेत. दिनांक २५ रोजी रात्री ८ वाजता सावित्रीबाई फुले हायस्कूल अंधेरी – घाटकोपर रोड, टिळक नगर साकीनाका अंधेरी पूर्व याठिकाणी स्नेहसंमेलनाचा कौटुंबिक सोहळा संघाने आयोजित केला आहे. या संम्मेलन सोहळ्याला मुले उपस्थित राहणार आहेत. मुंबई संघाबरोबरच सांगुळवाडी गावच्या सुकन्या सौ. ज्योती (सुभेदार) रावराणे यांचे या उपक्रमात मोठे योगदान आहे. या सहलीमध्ये विद्यार्थी, शिक्षक व पालक असे एकूण ५९ जण सहभागी होणार आहेत. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश पाटील, प्रशालेचे मुख्याध्यापक मिलिंद सर्पे हेदेखील सहलीत सहभागी होणार आहेत. तरी गावातील मुंबई येथे राहणारे चाकरमानी, माजी विद्यार्थी व मंडळ, संघातील सदस्यांनी सहलीला येणाऱ्या मुलांचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी या संम्मेलनाला उपस्थित राहावे असे आवाहन प्रकाश पाटील व किशोर रावराणे यांनी केले आहे.
सांगुळवाडी प्रशालेतील मुले ‘मुंबई दर्शन’ शैक्षणिक सहलीमध्ये होणार सहभागी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES



