कारवाई झाली तरी बेहत्तर…आम्ही दिलीप नार्वेकरांसोबत

2

जिल्हा काँग्रेसची भूमिका; आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून एकत्र आलो…

सावंतवाडी ता.२३: कारवाई झाली तरी फरक नाही.आम्ही जिल्हा काॅग्रेस दिलीप नार्वेकर यांच्या माध्यमातून सावंतवाडी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहोत.आता माघार नाही,अशी भूमिका आज येथे जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत मांडली.जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी राजीनामा दिला आहे.त्यामुळे त्यांनी काय भूमिका घेतली हे आम्हाला मान्य नाही.नार्वेकरांना देण्यात आलेले पत्र खरे की खोटे याच्या खोलात आम्ही जाऊ इच्छित नाही,असेही यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आज येथे पदाधिका-यांनी बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत आपली भूमिका विषद केली.यावेळी प्रकाश जैतापकर, पुष्पसेन सावंत, दिलीप नार्वेकर, प्रकाश मोर्ये, दादा परब, बाळा गावडे, राजू मसुरकर ,महेंद्र सावंत ,विजय प्रभू, महेंद्र सांगेलकर, समिर वंजारी साक्षी वंजारी, कौस्तुभ गावडे, विभावरी सुकी आदी उपस्थित होते.
यावेळी पदाधिकारी म्हणाले, जिल्हा काँग्रेसच्या माध्यमातून ही भूमिका घेण्यात आली आहे.त्यामुळे कोणी कारवाईची धमकी देत असेल तर आम्ही त्याला जुमानत नाही,आम्ही सर्व पक्षिय पक्षासाठी एकत्र आलो आहोत.कुणी माघार घेण्यास सांगितले हे महत्त्वाचे नाही, तसेच कारवाईचा इशारा देणाऱ्या लोकांची आम्ही पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी कडे तक्रार करू,असा इशारा यावेळी देण्यात आला.

4