सावंतवाडा उत्कर्ष मंडळाचे ३१ डिसेंबरला आयोजन…
वेंगुर्ले ता.२३: नवीन वर्षाचे औचित्य साधून लहान मुलांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने सलग १७ व्या वर्षी उत्कर्ष कला क्रीडा मंडळाच्या वतीने बारा वर्षाखालील लहान गट व बारा वर्षावरील मोठा गट अशा दोन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आलेले आहे.
सदर स्पर्धा दोन गटांमध्ये असून प्रथम क्रमांकासाठी रोख ₹२०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५००, तृतीय क्रमांकासाठी ₹१००० व प्रत्येकी चषक असे परितोषिकांचे स्वरूप आहे.
त्याचप्रमाणे तुळस गाव मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन दुपारी ३.०० वाजता करण्यात आले असून या स्पर्धेचा विषय गव्हापासून पासून बनणारे पदार्थ असा आहे. अधिक माहिती साठी चंद्रकांत सावंत (९४२३५१३७६९) व सुभाष सावंत (९३०९८४७७६८) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



