पक्षानेच मला तिकीट दिली त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच नाही…

258
2

दिलीप नार्वेकर;मीच स्वतः वकील त्यामुळे कारवाई झाल्यानंतर काय ते बघू…

सावंतवाडी ता.२३: पक्षानेच मला तिकीट दिले,नेत्यांनीच मला उभे राहायला सांगितले.त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही.मी स्वतः वकील आहे.त्यामुळे कारवाईला घाबरत नाही.आणि पक्षाकडुन कारवाई झाल्यानंतर बघू,अशी खिल्ली काँग्रेसचे उमेदवार दिलीप नार्वेकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत उडवली.माझी उमेदवारी पक्षाच्या नेत्यांनी “फिक्स” केली आहे.त्यात खुद्द हुसेन दलवाई, हसन मुश्रीफ, हुस्नबानू खलिफे आदी मोठे नेते होते.त्यावेळी ही उमेदवारी माघार घेण्यासाठी दिलेली नाही,असे बजावून मी एबी फॉर्म दिला होता. त्यामुळे आता मी माघार कशी घेणार ? असाही प्रश्न यावेळी उपस्थित केला.

यावेळी प्रकाश जैतापकर, पुष्पसेन सावंत, दिलीप नार्वेकर, प्रकाश मोर्ये, दादा परब, बाळा गावडे, राजू मसुरकर ,महेंद्र सावंत ,विजय प्रभू, महेंद्र सांगेलकर, समिर वंजारी साक्षी वंजारी, कौस्तुभ गावडे, विभावरी सुकी,राघू नार्वेकर, संजय नार्वेकर आदी उपस्थित होते.
श्री.नार्वेकर यांनी पत्रकार परिषदे दरम्यान आपली भूमिका मांडली. ते म्हणाले आपण काँग्रेसचा अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहे.मला जनमत चांगले आहे.त्यामुळे काही झाले तरी मी निवडून येणार आहे.माझा ए बी फॉर्म खुद्द पक्षाच्या नेत्यांनी दिला.त्यामुळे ते शुभेच्छापत्र खरे की खोटे हे सांगण्यापेक्षा मी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे,हे महत्त्वाचे आहे.पक्षासाठी आणि पक्षाची तीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.लोकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन माझा विजय निश्चित आहे.त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही,असे नार्वेकर म्हणाले.

 

4