मळगाव-जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत पलाशा,समृद्धीचे यश…

84
2

बांदा.ता,२३:
मळगाव येथील (कै.) उदय रमाकांत खानोलकर वाचनालयात आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आठवी ते दहावी या मोठ्या गटात पलाशा राजन सामंत (नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालय) तर पाचवी ते सातवी या लहान गटात समृद्धी कृष्णा गवस (मळगाव इंग्लिश स्कुल, मळगाव) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेला जिल्ह्यातील स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या गटात हर्षदा संदीप सावंत (वेंगुर्ले हायस्कुल) हिने द्वितीय तर तन्वी प्रशांत बांदेकर (व्ही. एन. नाबर इंग्लिश स्कुल, बांदा) हिने तृतीय क्रमांक मिळविला. मानसी महेश आरोस्कर (विद्याविहार इंग्लिश स्कुल, आरोस), पूजा अजय सावंत (नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलि) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. लहान गटात निशांत महेश नाईक (खेमराज हायस्कुल, बांदा), मानसी महेश राऊळ (मदर क्वीन इंग्लिश स्कुल, सावंतवाडी) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. मधुरा मिलिंद सावंत (भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालय, माजगाव), राधिका गणपत तेरसे (कुडाळ हायस्कुल) यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. एन. डी. कार्वेकर, शुभांगी धर्म, संजीवनी गवस, एच. व्ही. मालवणकर यांनी केले. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर, चंद्रशेखर अय्यर, पत्रकार प्रवीण मांजरेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी डीचोलकर यांनी केले. स्वागत सचिव गुरुनाथ नार्वेकर यांनी केले. आभार विलास मळगावकर यांनी मानले.

4