बांद्यात उद्या ‘अविष्कार तारकांचा’…

99
2

खास महिलांसाठी कार्यक्रम; क्रिएटिव्ह सखी ग्रुपचे आयोजन…

बांदा.ता,२३: 
येथील क्रिएटिव्ह सखी ग्रुपच्या वतीने खास महिलांसाठी अविष्कार तारकांचा २०१९ या कार्यक्रमाचे आयोजन २४ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
रात्री ठीक ८ वाजता येथील विट्ठल रखुमाई मंगल कार्यालयात जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कणकवलीच्या नगरसेविका सुप्रिया नलावडे भूषविणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
खास विवाहित महिलांसाठी ‘सौभाग्यवती सौंदर्य स्पर्धा’ होणार असून विजेत्या सौभाग्यवतीला ५००० रुपये आणि मानाचा मुकुट देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक ३००० रुपये व तृतीय पारितोषिक २००० रुपये देण्यात येणार आहे.
समूह नृत्य, हिंदी-मराठी गितगायन, एकपात्री अभिनय आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी रिया वाळके, रुपाली शिरसाठ किंवा अंकिता स्वार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

4