मालवण, ता. २३ : टीटीडीएसचे संस्थापक अध्यक्ष, घर मिठबावकर रिसॉर्टचे मालक रमेश बाबू मिठबावकर (वय-७१ रा. वायरी बांध) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
वायरी बांध येथील रहिवासी रमेश मिठबावकर यांनी तारकर्लीत सर्वप्रथम पर्यटन व्यवसायास सुरवात केली. ज्या काळात पर्यटन व्यवसाय म्हणजे मूर्खपणा असे म्हटले जायचे. त्या काळात रमेश मिठबावकर यांनी पर्यटन व्यवसायात उतरण्याचे धाडस दाखविले. तारकर्ली येथील पर्यटन विकास महामंडळाचे कँटीन, त्यानंतर घर मिठबावकर या नावाने पर्यटकांसाठी निवास न्याहरीची सुविधा उपलब्ध केली. तारकर्ली येथे पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता मिठबावकर यांच्या पाठोपाठ अनेक स्थानिकांनी पर्यटन हा चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय असल्याचे जाणत या व्यवसायात उतरण्याचा निश्चय केला. याचकाळात तारकर्लीत येणार्या पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मिठबावकर यांनी सर्वात प्रथम टीटीडीएस या पर्यटन संस्थेची निर्मिती केली. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. पर्यटनच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. गेले काही महिने ते आजाराने त्रस्त होते. आज पहाटे खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात भाऊ, बहिणी, मुलगा, मुली, जावई, पुतणे, पुतण्या, सून, नातवंडे असा परिवार आहे. पर्यटन उद्योजक मिथिलेश मिठबावकर यांचे ते वडील होत. मिठबावकर यांच्या निधनाने पर्यटन क्षेत्राची मोठी हानी झाली अशा शब्दांत अनेक पर्यटन व्यावसायिकांनी श्रद्धांजली वाहिली.
टीटीडीएसचे संस्थापक अध्यक्ष रमेश मिठबावकर यांचे निधन…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES