करुळ येथील युवकास मारहाण,एकावर गुन्हा दाखल

212
2

 

वैभववाडी.ता,२३:

गुरांनी काजूची नासधूस केल्याची विचारणा करण्यास गेलेल्या भूषण धनंजय पडवळ वय २२ वर्षे रा. करुळ दिंडवणे या युवकाला मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी प्रदीप विश्वनाथ पडवळ वय ५५ वर्षे रा. करुळ दिंडवणे याच्याविरोधात वैभववाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदिप पडवळ यांची गुरे भूषण पडवळ यांच्या कंपाऊंड गेली. त्यांनी गुरे बाहेर काढून आरोपीस तुमची गुरे काजूची नासधूस करतात अशी विचारणा केली असता, याचा राग येवून आरोपीने हातातील काठीने फिर्यादी भूषण यास मारहाण व शिवीगाळ करुन धमकी दिली. याप्रकरणी वैभववाडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल राजू जामसंडेकर करीत आहेत.

4