कुडाळ-पडवे येथे श्रमदानातून वनराई बंधारा…

120
2

ओरोस ता.२३: कुडाळ तालुक्यातील पडवे गावात पिण्याच्या पाण्याचीटंचाई भविष्यात जानवू नये. तसेच गावातील ओहोळ, नाल्यामधील पाणी आटु नये, यासाठी “पाणी आडवा, पाणी जिरवा” या मोहिमे अंतर्गत पडवे ग्रामपंचायत व सतसंग धन निरंकिरी संस्था, ओरोस यांच्या वतिने रविवारी ब्राम्हणवाडी येथिल ओहोळावर दोन मोठे वनराई बंधारे बांधण्यात आले.
गेल्या वर्षी १८ लहान मोठे वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम राबविण्यात आला होता. भुगर्भातील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. मोठ्या प्रमाणात उष्णतेचे परिणाम जलचर प्राणी, जनावरे, पशु- पक्षी आदींना जाणवत आसतो.तसेच विहीरींचा पाणी साठा कमी होतो. या पिण्याच्या पाण्याच्या साठवणीत वाढ व्हावी. चांगल्याप्रकारे पाणी साठा उपलब्ध रहावा या करिता वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत.
सतसंग धन निरंकारी संस्थेचे हनुमंत सावंत सरपंच सुभाष दळवी, ग्रामसेवक निलेश तांबे, उपसरपंच शिताराम पारकर, ग्रामं सदस्य, कर्मचारी योगेश बोभाटे, पांडू परब, तसेच ग्रामस्थ संतोष परब, दळवी, पी बी कुंभार सर आदीसह उपस्थित होते.

4