Tuesday, March 18, 2025
Google search engine
HomeUncategorizedखवले मांजराची विक्री करणाऱ्या तिघांना जेरबंद...

खवले मांजराची विक्री करणाऱ्या तिघांना जेरबंद…

कोल्हापूर वनविभाग पथकाची कारवाई; संशयितांना २६ पर्यंत कोठडी…

खवले मांजराची विक्री करणाऱ्या तिघा संशयित आरोपींच्या कोल्हापूर वनविभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. ही कारवाई रविवारी गगनबावडा येथे घडली. याप्रकरणी संशयित आरोपींना २६ डिसेंबर पर्यंत कोठडी मिळाली आहे. अनिकेत अंकुश संसारे वय २० वर्षे व नितीन अनंत रामाणे वय २० वर्षे रा. मांगवली तसेच आनंदा खामकर रा. इटकरे, जि. सांगली अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहीतीवरुन कोल्हापूर वनविभागाचे युवराज पाटील फिरते पथक कोल्हापूर यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह गगनबावडा येथे सापळा रचला. यावेळी सदर संशयित आरोपी अनिकेत संसारे, नितीन रामाणे व रमेश खामकर यांना जिवंत खवल्या मांजरासह रंगेहाथ ताब्यात घेतले. या तिघांवर वन्य प्राणी विक्री करणे, वाहतूक करणे, ताब्यात ठेवणे. याप्रकरणी भारतीय वन्य जीव अधिनियम २९७२ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
याप्रकरणी रविवार २२ डिसेंबर रोजी उपवन संरक्षक सावंतवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यक्षेत्रपाल रमेश कांबळे, वैभववाडी वनपाल सदाशिव वागरे, वनरक्षक किरण पाटील, अमिन काकतीकर, कोल्हापूर वन विभागाचे फिरत्या पथकाचे अधिकारी युवराज पाटील व त्यांचे सहकारी यांनी मांगवली येथे जावून संशयित आरोपी अनिकेत संसारे यांच्या घराची झडती घेतली. यांच्याकडे एक सिंगल बोर काडतुस बंदुकव इतर काही संशयित वस्तू सापडल्या आहेत. मात्र, दुसरा आरोपी नितीन रामाणे याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडे काहीच आढळून आले नाही.
जिवंत खवले मांजर विक्री प्रकरणामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का याची कसून चौकशी वनविभागाकडून सुरू आहे. खवले मांजर हे वन्य प्राणी अनुसूची एक(अति दुर्मिळ) मध्ये समाविष्ट असून गुन्हा सिद्ध झाल्यास सहा महिने व तीन वर्षे पर्यत कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा होवू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments