सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न…

2

ओरोस ता २३: वाचनाची गोडी ही घरापासून लावली पाहिजे. त्याला शाळांमध्ये खतपाणी मिळाल पाहिजे. तरच वाचनाची आवड मुलांना लागेल. कारण वाचन संस्कृती ही महत्त्वाची आहे. जर वाचन संस्कृतीचा विनाश झाला तर माणुसकीचा विनाश होण्यास वेळ लागणार नाही. सध्याच्या डिजिटल युगाचा वापर ग्रंथालयांनीही स्वीकारला पाहिजे. त्याप्रमाणे आपल्यातही बदल केले पाहिजेत, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष अनंत वैद्य यांनी केले.
सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ आणि शारदा ग्रंथालय कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या गुरुदक्षिणा सभागृहात रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनंत अप्पाजी वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार विजय शेट्टी उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत, तसेच कसाल गावच्या सरपंच सौ संगीता परब, पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, ग्रंथालय संचालक कोकण विभाग मंजुषा साळवे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रतिभा ताटे, कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे सचिव यशवंत परब, शारदा ग्रंथालय कसालचे अध्यक्ष प्रकाश नारकर, कसाल हायस्कूलचे मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर, ज्येष्ठ पत्रकार विजय मांडे, सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष धाकू तानावडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह मंगेश मस्के, कवी रुजारिओ पिंटो, सखाराम हरमलकर, आदी मान्यवर उपस्थित होते, या अधिवेशनाला जिल्हाभरातून ग्रंथालय संघाचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

4