राष्ट्रवादीचे जिल्हाधिकार्यांना निवेदन;सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध …
सिंधुदुर्गनगरी.ता,२३:
रिझर्व बँक आणि देवस्थान तिजोरी वर वक्रदृष्टी टाकता यावी आणि आपली स्वतःची वोट बँक उभी करण्यासाठी भाजपा सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीने केला आहे तसेच या कायद्यामुळे धर्मनिरपेक्षेला धोका असल्याने या कायद्याला सिंधुदुर्ग जिल्हा राष्टवादी कोंग्रेस पक्षाने विरोध केला आहे. या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ दिलिप पांढरपट्टे यांना सादर केले.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्टवादी कोंग्रेस पार्टीच्या शिष्ठमंडळाने आज जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांची भेट घेत निवेद सादर केले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, धर्मा बागकर, मकरंद परब, योगेश कुबल, आत्माराम ओटवनेकर, सावळाराम अनावकर, बाळ कनयाळकर, प्रफुल्ल सुद्रिक, सचिन पाटकर आदि उपस्थित होते.
केंद्र सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा तयार केला आहे. या कायद्यामुळे भारतीय संविधानात्मक लोकशाही आणि धर्मनिरपेक्षेला धोका निर्माण होणारा आहे. त्यामुळे या कायद्याला देशात विविध स्तरावरुन विरोध केला जात आहे. राज्यातही काही ठिकाणी विरोध नोंदविला जात आहे. तसेच रिझर्व बँक आणि देवस्थान तिजोरी वर वक्रदृष्टी टाकता यावी आणि आपली स्वतःची वोट बँक उभी करण्यासाठी भाजपा सरकारने सुधारित नागरिकत्व कायदा लागू केला असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टीने केला आहे तसेच या कायद्यामुळे धर्मनिरपेक्षेला धोका असल्याने या कायद्याला सिंधुदुर्ग जिल्हा राष्टवादी कोंग्रेस पक्षाने विरोध करत याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ दिलिप पांढरपट्टे यांना सादर केले आहे.