कवयित्री सरिता पवार यांना स्मृतीगंध राज्यस्तरीय शिक्षिका पुरस्कार…

2

कणकवली, ता.२३: तालुक्यातील माईण नं.1 या प्राथमिक शाळेतील सहाय्यक शिक्षिका तथा प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांना तांबे एज्युकेशन सोसायटी मुंबईच्या कणकवली शाखेच्यावतीने स्मृतिगंध राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तांबे एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा सुगंधा तांबे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तांबे एज्युकेशन सोसायटी शाखा कणकवलीच्यावतीने हा पुरस्कार दिला जातो. यात दरवर्षी शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्‍या शिक्षकांना गौरविण्यात येते. सन 2019 सालचा आदर्श शिक्षिका पुरस्कार माईण जिल्हा परिषद शाळा नं 1 च्या सहाय्यक शिक्षिका तथा कवयित्री व लेखिका सरिता सदाशिव पवार यांना जाहीर करण्यात आला होता.

4