Monday, March 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकणकवली शहराला ओडीएफ प्लस मानांकन...

कणकवली शहराला ओडीएफ प्लस मानांकन…

नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांची माहिती : पाच कोटींचा निधी : ३ स्टार मानांकनासाठी प्रयत्न

कणकवली, ता.23 : हागणदरीमुक्त शहराचा दर्जा तपासणी करणार्‍या केंद्र शासनाच्या गुणवत्ता परिषदेकडून कणकवली शहरास ओडीएफ प्लस मानांकन दर्जा देण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत सन 2018-19 या वर्षांसाठी हे ओडीएफ मानांकन आहे. हे मानांकन मिळाल्याने नगरपंचायतीला अडीच कोटीचा प्रोत्साहन निधी मिळाला आहे. तर उर्वरीत अडीच कोटींचा निधी लवकरच प्राप्त होणार आहे. यंदा देखील नागरिकांच्या सहकार्यातून 3 स्टार मानांकन मिळविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे आणि मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी दिली.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत उघड्यावर शौचास बसण्यास प्रतिबंध घालण्याकरिता देशभरात विशेष अभियान राबविण्यात आले. यात कणकवली शहरात याची काटेकोरपणे अंमलबजावणी करताना सर्वच प्रभागात सार्वजनिक शौचालये उभारणीला प्राधान्य देण्यात आले. तसेच वैयक्तिक कुटुंबांना देखील शौचालयासाठी अनुदान देण्यात आले. याखेरीज घनकचर्‍याचे विलगीकरण केले जात आहे. ओला, सुका आणि घातक कचर्‍यावर प्रक्रिया देखील केली जात असल्याची माहिती मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments