दत्ताराम साटम,प्रकाश केळुसकर यांना वारकरी संप्रदायाचे संतसेवा पुरस्कार जाहीर

2

२९ रोजी कसाल येथे होणार वितरण…

कणकवली, ता.२३:  सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे संतसेवा पुरस्कार दत्ताराम आकाराम साटम (करुळ, वैभववाडी) आणि प्रकाश शंभा केळुसकर (आंबेगाव, सावंतवाडी) यांना आज जाहीर करण्यात आले. 29 डिसेंबरला कसाल गांगोची राई मठ येथे पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यात पुरस्कार विजेत्यांचा गौरव केला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय, सिंधुदुर्ग ची बैठक आज कणकवलीत झाली. यात संतसेवा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्यावतीने गेली 8 वर्षे वारकर्‍यांचा जिल्हास्तरीय मेळावा घेतला जात आहे. यात यंदाच्या मेळाव्यालाही मोठ्या प्रमाणात वारकरी बांधव सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ गवंडळकर आणि सचिव राजू राणे यांनी दिली. दरम्यान आजच्या बैठकीला उपाध्यक्ष हरीचंद्र पारधीये, खजिनदार मधुकर प्रभुगावकर तसेच वारकरी बांधव उपस्थित होते.

4