नागवे येथे युवकास बेदम मारहाण…

241
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२३:  तालुक्यातील नागवे गावातील अक्षय सखाराम घाडीगावकर (वय 22, गावकरवाडी) या युवकास 10 ते 15 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार आज पहाटे घडला. जखमी युवकावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रिकेट सामन्यातील वादातून आपणास मारहाण झाल्याचे या तरुणाने पोलिसांना सांगितले आहे.

नागवे गावात काल रविवारी क्रिकेट सामना झाला होता. याठिकाणी क्रिकेट खेळत असताना अक्षय आणि त्याच्या मित्रांचा दुसर्‍या संघातील खेळाडूंशी वाद झाला होता. सामना संपल्यानंतर या वादावर पडदा पडला. मात्र आज पहाटे अक्षय हा कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. नागवे रस्त्यावरील ढवण दुकान येथील बसथांब्यावर आला असताना त्याला 10 ते 15 जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली असा जबाब त्याने कणकवली पोलिसांना दिला आहे.