शेर्ले-बांदयाला जोडणाऱ्या बहुचर्चित पुलाचे आज भूमिपूजन…

2

अक्रम खान यांची माहीती;आठ फुट लांबीचे उभारले जाणार पुल…

बांदा.ता,२४: 
शेर्ले दशक्रोशीला बांदा शहराशी जोडणाऱ्या तेरेखोल नदीपत्रावरील बहुचर्चित पुलाचे भूमिपूजन आज सकाळी होणार असल्याची माहिती बांदा सरपंच अक्रम खान यांनी दिली आहे. जीवन प्राधिकरण विभागाची सासोली (दोडामार्ग) ते वेंगुर्ले जाणारी पाण्याची पाईपलाईन तेरेखोल नदीपात्रातून जात असल्याने बांदा-आळवाडी येथे पूल प्रस्तावित आहे. गेली कित्येक वर्षे या नदीपात्रात पुलाची मागणी होत आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलने देखील करण्यात आली होती.
मात्र एक किलोमीटर परिसरात ३ पुलंना मान्यता देत नसल्याचा मापदंड शासन वापरत असल्याने येथील पुलाच्या मागणीला केराची टोपली दाखविण्यात येत होती. पाण्याच्या पाईपलाईनसाठी ८ फूट रुंदीचे पूल उभारण्यात येणार आहे. याचा फायदा शेर्ले दशक्रोशीतील लोकांना बांदा शहरात येण्यासाठी होणार आहे.

4