सरपंच जोसेफ डॉन्टस यांच्या हस्ते उद्घाटन….
कुडाळ.ता,२४: तालुक्यातील माणगाव श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव हायस्कूलच्या पाचवी ते सातवी मुलांचा भरला गावठी बाजार या बाजारामध्ये विविध प्रकारच्या पाले भाज्या ,कनगे, विविध प्रकारची कडधान्य ,गावठी कोंबडी ,गावठी अंडी ,फळांचा ज्यूस, पोहे, गावठीतांदूळ ,अशा विविध प्रकारच्या गावठी वस्तू मुलांनी विकायला ठेवल्या होत्या. यामधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान उपलब्ध व्हावा. विद्यार्थ्यांना शिका व कमवा या संकल्पनेचा विकास द्यावा. या गावठी बाजारामध्ये मोठ्या संख्येने पालक वर्ग व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अवघ्या दीड तासांमध्ये बाजारामध्ये आणलेल्या विद्यार्थ्यांचे वस्तू विक्री करण्यात आले. या गावठी बाजारामध्ये प्राथमिक विभाग त्यांची संकल्पना ही श्री पटकारे सर, सौ सीमा गावडे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलं.
यावेळी उद्घाटन माणगाव चे सरपंच श्री जोसेफ डॉन्टस ,प्रशासक श्री आकेरकर सर, प्रभारी मुख्याध्यापक श्री चव्हाण सर, उपमुख्याध्यापक पिळणकर सर, सर्व शिक्षक उपस्थित होते.