शेर्ले बांदा पूल ग्रामस्थांच्या एकजुटीचे यश…

2

प्रमोद कामत यांच्या हस्ते भूमिपूजन;ग्रामस्थांतून समाधान…

बांदा.ता,२४: 
शेर्ले दशक्रोशीला जोडणाऱ्या जीवन प्राधिकारणच्या बहुचर्चित पुलाचे भूमिपूजन आज माजी सभापती तथा जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न झाले. हे पूल एकजुटीच्या मेहनतीचे यश असल्याचे प्रतिपादन कामत यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उन्नती धुरी, बांदा सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच उदय धुरी, पंचायत समिती सदस्य शीतल राऊळ, तोरसे जिल्हा परिषद सदस्य रमेश सावळ, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, प्रसाद पावसकर, राजा सावंत, निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, ज्ञानेश्वर सावंत, गुरुनाथ सावंत, ग्रामपंचायत सदस्य किशोरी बांदेकर, श्यामसुंदर मांजरेकर, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, मधुकर देसाई यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

4