वेंगुर्ले येथे १ जानेवारीपासून भव्य कीर्तन महोत्सव…

147
2

वेंगुर्ला.ता.२४: 
वेंगुर्ला तालुका ब्राह्मण मंडळ, युवाशक्ती प्रतिष्ठान वेंगुर्ला व श्री देव रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सलग आठव्या वर्षी जिल्ह्यातील कीर्तन रसिकांसाठी दि. १ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिर येथे सायंकाळी ५.३० ते ८.३० या वेळेत भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कीर्तन महोत्सवात दि. १ रोजी ह.भ.प.सौ.मंजुषा भावे (मुंबई) या ‘स्वातंत्र्यविर सावरकर‘, दि. २ रोजी ह.भ.प.महेश काणे (चिपळूण) हे ‘श्रीमती स्वयंवर‘, दि. ३ रोजी ह.भ.प.विवेक गोखले (नृसिहवाडी) हे ‘शिशूपाल वध‘, दि. ४ रोजी ह.भ.प.प्रभंजन भगत (लोणीप्रवरा) हे ‘श्री संत राका कुंभार‘, दि. ५ रोजी ह.भ.प.निहाल खांबेटे (पुणे) ‘महाराणा प्रताप‘ आदी विषयांवर कीर्तन करणार आहेत. तर या सर्व कीर्तनांना प्रसाद मेस्त्री (तबला), अमित मेस्त्री (ऑर्गन), माधव ओगले (हार्मोनियम) व निलेश पेडणेकर (पखवाज) यांची संगीत साथ लाभणार आहे. तरी सर्व कीर्तन रसिकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

4