माध्यमिक व प्राथमिक शाळांसाठी विविध स्पर्धा…

2

तुळस येथे ११ जानेवारी ला आयोजन…

वेंगुर्ले.ता.२३: वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्या वतीने कला-क्रीडा-सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धात्मक अशा अश्वमेध तुळस मोहोत्सवांतर्गत ११ जानेवारी २०२० रोजी श्री वेताळ मंदिर तुळस, खरीवाडा येथे सायंकाळी ६.३० वा शाळांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून प्रतिवर्षीप्रमाणे सर्वोत्कृष्ट सादरीकरणांसाठी मानाचा वेताळ करंडक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
सदर जिल्हास्तरीय माध्यमिक विद्यालयाच्या, (५ वी ते १० वी पर्यंत चा गट) स्पर्धामध्ये समूहगीत गायन, समूहनृत्य, जोडीनृत्य, लावणी नृत्य, प्रश्नमंजुषा अशा स्पर्धांचा समावेश आहे. विजेत्या प्रथम तीन क्रमांकास रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र तर सर्वच स्पर्धा प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या विद्यालयास वेताळ करंडक २०२० सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
तसेच जिल्हास्तरीय प्रथामिक शाळांसाठी (१ली ते ४थी पर्यंत चा गट) समूहनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली असून सदर स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकास रु ७००, ५००, ३०० चषक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे. अधिक माहिती व नाव नोंदणी साठी ०९ जानेवारी २०२० पर्यंत प्रा.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) व सचिव गुरुदास तिरोडकर (९४२०७४७२६८) याच्याशी संपर्क साधावा. तरी जास्तीच जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावे असे आवाहन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विवेक तिरोडकर व नाना राऊळ यांनी केले आहे.

3

4