दिपक केसरकर;आचारसंहितेनंतर नोक-या,सेट टाॅप बाॅक्सचा मार्ग मोकळा…
सावंतवाडी ता.२४: महाविकास आघाडीशी फारकत घेवून काँग्रेसचे उमेदवार दिलीप नार्वेकर यांनी केलेली बंडखोरी ही नारायण राणेंना मदत करण्याचा डाव आहे,असा आरोप माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.आचारसंहितेमुळे या ठीकाणी नोक-या आणि सेट टाॅप बाॅक्सचे आश्वासन पुर्ण झालेले नाही.मात्र चार जानेवारी नंतर हे सर्व प्रश्न सुटतील,आणि त्या प्रकल्पाचे उदघाटन होईल,त्यामुळे आता टिका करणा-यांनी त्या ठीकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशीही टिका त्यांनी राजन तेली यांचे नाव न घेता केली.
ते येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी राजन पोकळे, जावेद शेख,मयू पटेकर,शैलेश गवंडकर,राहुल नाईक,नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.