खारेपाटण येथे हिंदुत्ववादी संघटनांची निदर्शने…

2

खारेपाटण ता. २४:  केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान यांसह अन्य देशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी धर्मीय शरणार्थी भारताचे नागरिकत्व देणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत केले. सरकारने लोकशाही मार्गाने आणि राज्यघटनेच्या अधिकारात हा निर्णय घेतला असताना नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणार्‍या समाजकंटकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आज खारेपाटण बसस्थानकासमोर हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, तसेच राष्ट्र अन् धर्मप्रेमी नागरिक यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे श्री दैवेश रेडकर, श्री गजानन मुंज, सनातन संस्थेचे संजोग साळसकर, हिंदु विधिज्ञ परिषदेच्या अधिवक्ता सौ.कावेरी राणे यांनी विचार मांडले. श्रीकालभैरव मंदिराचे विश्वस्त मधुकर गुरव, डॉ नितीन ढवण, शाम कोळसुलकर, सौ. माधुरी ढवण, सौ. भारती सावंत, शिवाजी कानडे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी कायद्याचा विरोध करण्याऱ्या आणि राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. डॉ.नीता देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

4