Sunday, January 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यावेंगुर्ले पंचायत समिती तर्फे आयोजित बंधारादिन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद...

वेंगुर्ले पंचायत समिती तर्फे आयोजित बंधारादिन कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद…

तालुक्यात आतापर्यंत ३११ बंधारे बांधून पूर्ण

वेंगुर्ले.ता.२४ : वेंगुर्ले पंचायत समितीमार्फत साजरा करण्यात आलेल्या बंधारा दिना दिवशी तालुक्यातील ३० गावात स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रा. प. सरपंच, सदस्य, अधिकारी, ग्रामसेवक, स्थानिक सामाजिक संस्था, युवक मंडळे यांच्या सहकार्याने २१२ बंधारे पूर्ण करण्यात आले. दरम्यान सुरुवातीपासून आता पर्यंत तालुक्यात एकूण ३११ बंधारे बांधून पूर्ण करण्यात आल्याची माहिती सभापती सुनील मोरजकर व कृषी अधिकारी विद्याधर सुतार यांनी दिली आहे.
तालुक्यात संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून त्यावर मात करण्यासाठी तालुक्यातील ३० ग्रा. प. मध्ये वनराई व कच्चे बंधारे घालण्यास पं. स. कडून लोकांना प्रवृत्त करण्यात आले होते. तालुक्याला एकूण ५०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. काही ठिकाणी पाण्याचा स्रोत जास्त असल्यामुळे त्याठिकाणी सुद्धा लवकरच बंधारे घालून जानेवारी अखेरपर्यंत बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही यावेळी सभापती मोरजकर यांनी व्यक्त केला. बंधारा दिना दिवशी तालुक्यात लोकप्रतिनिधी व अधिकारी यांची चार पथके तयार करण्यात आली होती. या पथकांमार्फत या बंधारा कार्यक्रमाचे नियंत्रण करण्यात आले. म्हापण पंचक्रोशीत सभापती सुनील मोरजकर, कृषी अधिकारी विद्याधर सुतार, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आदन्नवार, पं स सदस्य प्रणाली बंगे, गौरवी मडवळ यांचे पथक, वेतोरे पंचक्रोशीत उपसभापती स्मिता दामले, गटविकास अधिकारी उमा पाटील, सदस्य अनुश्री कांबळी, साक्षी कुबल, कृषी अधिकारी शुभदा कविटकर, विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर यांच्या पथकाची तसेच तुळस पंचक्रोशीत माजी सभापती यशवंत परब, सदस्य श्यामसुंदर पेडणेकर, सभापती स्वीय सहाय्यक अजय नाईक, शिरोडा पंचक्रोशीत सदस्य मंगेश कामत, सिद्धेश परब, कृषी विस्तार अधिकारी संदेश परब यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी ३० गावातील सरपंच, ग्रामस्थ यांनी चांगला प्रतिसाद देऊन सहकार्य केल्यामुळे सभापती मोरजकर यांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments