वैभववाडी.ता,२४: वाभवे-वैभववाडी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपाच्या सौ अक्षता अरुण जैतापकर यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. पीठासन अधिकारी वैशाली राजमाने यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. नगराध्यक्ष पदासाठी सौ. अक्षता जैतापकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला होता. त्यांच्या निवडीनंतर भाजपा पदाधिकारी व नगरसेवक यांनी अभिनंदन केले.
पक्षीय धोरणानुसार नगराध्यक्ष दीपा गजोबार यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता. नगराध्यक्षपद हे महिला ओबीसीसाठी राखीव आहे. सद्यस्थितीत या नगरपंचायतमध्ये एकूण १७ पैकी १७ नगरसेवक भाजपाचे आहेत. तसेच दोन स्वीकृत नगरसेवक ही भाजपाचे आहेत. या पदासाठी नगरसेविका समिता कुडाळकर, अक्षता जैतापकर, मनीषा मसुरकर यांची नावे चर्चेत होती. आमदार नितेश राणे यांनी या पदासाठी सौ. अक्षता जैतापकर यांचे नाव घोषित केले होते.
अखेर २४ डिसेंबर रोजी अक्षता जैतापकर यांच्या नावाची अधिकृत घोषणा पीठासन अधिकारी वैशाली राजमाने यांनी केली. यावेळी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, रवींद्र रावराणे, बांधकाम सभापती संतोष पवार, शिक्षण सभापती समिता कुडाळकर, नगरसेवक संजय सावंत, सज्जनकाका रावराणे, उत्तम मुरमुरे, संतोष माईणकर, स्वप्नील इस्वलकर, शोभा लसणे, सुप्रिया तांबे, सरिता रावराणे, संपदा राणे, सुचित्रा कदम, मनीषा मसुरकर आदी उपस्थित होते.
भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राणे, अरविंद रावराणे यांनी नगराध्यक्ष अक्षता जैतापकर यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपा नेते प्रमोद रावराणे, सुधीर नकाशे, दिलीप रावराणे, बाळा हरयाण, हर्षदा हरयाण, स्नेहलता चोरगे, सीमा नानिवडेकर व नगरसेवक, भाजपा पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत नगराध्यक्षपदी अक्षता जैतापकर यांची बिनविरोध निवड…
2
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
4