वेंगुर्ले तालुकास्तरीय “ज्ञानी मी होणार” स्पर्धेत श्रेया,सृष्टी प्रथम…

195
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.२४: येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय “ज्ञानी मी होणार” स्पर्धेत लहान गटातून आसोली-फणसखोल शाळेतील विद्यार्थिनी कु.श्रेया प्रदीप गावडे व कु.सृष्टी शाम गावडे यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.
श्रेया व सृष्टी यांनी आपली शाळा दुर्गम भागात असून सुद्धा घवघवीत यश मिळवले आहे.या विद्यार्थ्यांना शाळा मुख्याध्यापिका सुजाता देसाई व शिक्षक प्रसाद गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.तर यशस्वी विद्यार्ध्यांचे अध्यक्ष विनोद गावडे,प्रदीप गावडे तसेच गावातील ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

\