तालुकास्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवात आचरा पिरावाडी शाळेची विशेष कामगिरी…

2

आचरा, ता. २४ : तालुकास्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार स्पर्धेत आचरा पिरावाडी येथील हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारातून अव्वल स्थान प्राप्त करीत उज्वल यश मिळविले आहे.

लहान गट – ५० मी. धावणे – अनुक्रमे- रुद्र प्रकाश बागवे, मृणाल विठ्ठल धुरी, १०० मी. धावणे – द्वितीय- रुद्र प्रकाश बागवे, उंच उडी – द्वितीय- सोहम प्रशांत गावकर, ५०×४ रिले – प्रथम- रुद्र बागवे, रुद्र जाधव, मृणाल धुरी, आर्यन आचरेकर
मोठा गट – गोळाफेक – प्रथम- सिद्धेश प्रशांत गावकर, उंच उडी – द्वितीय- ऐश्वर्या पवनकुमार पराडकर, २०० मी. धावणे- प्रथम- सिद्धेश प्रशांत गावकर, ज्ञानी मी होणार – प्रथम- सलोनी सुभाषचंद्र नाटेकर, वेदांत संतोष गोसावी
विशेष यशाने आचरा पिरावाडी शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. तत्पूर्वी झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत वक्तृत्व स्पर्धेत ऐश्वर्या पवनकुमार पराडकर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. या विशेष यशाबद्दल प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नित्यानंद तळवडकर, उपाध्यक्ष भावना कुबल, माजी सरपंच अनिल करंजे, डॉ. प्रमोद कोळंबकर मुख्याध्यापक सुभाषचंद्र नाटेकर, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

4