दीपक भाई ,प्रवीण भाईंची जोड-गोळी अखेर एकत्र

2

निमित्त महाविकास आघाडीचे;अनेक वर्षाचे कटुत्व संपले…

सावंतवाडी /अमोल टेंबकर: महाविकास आघाडीच्या निमित्ताने सावंतवाडीतील एकेकाळची प्रविणभाई दिपकभाईंची जोड-गोळी आज एकत्र दिसली.महाविकास आघाडीचे उमेदवार बाबू कुडतरकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज दोघे एकत्र आले.त्यामुळे अनेकांचे डोळे विस्फारून आले.दरम्यान या नंतरसुद्धा हे दोन्ही मित्र असेच एकत्र रहावे,असा विश्वास त्यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.त्यामुळे याप्रसंगी एकच हशा पिकला.दरम्यान आमच्यातले कटुता संपली आहे,असे सांगून श्री.भोसले यांनी त्याला दुजोरा दिला.
कुडतरकर यांच्या प्रचार कार्यालय गांधी चौक परिसरात सुरु करण्यात आले.याचे उद्घाटन महा विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले.यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,माजी पालकमंत्री दीपक केसरकर एकेकाळचे मित्र पुन्हा एकदा एकत्र आले.त्यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत,युवा नेते संदेश पारकर आदी उपस्थित होते.

याठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना श्री.भोसले यांनी केसरकर व भोसले यांची जोडी पुन्हा एकत्र येईल,असे भाकीत केले होते.त्यानुसार आज हे दोघे मित्र पुन्हा एकदा एकत्र आल्याचे दिसले,प्रवीण भाई व दीपक भाई हे राजकारणातील धुरंधर समजले जात असत,भोसलेंनी आपल्या हाताला धरून केसरकरांना राजकारणातले त्यानंतर केसरकरांनी यश मिळवले, परंतु नंतरच्या काळात या दोघांत वाद निर्माण झाले आणि त्या वादाचा पर्यवसान राजकारणापर्यंत गेले दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला,आणि गेली पाच ते सहा वर्षे ते वेग वेगळ्या पक्षात होते.आता दोन्ही नेते महा विकास आघाडीच्या प्रक्रियेत आहेत.त्याठिकाणी जिल्ह्याला चांगले दिवस येण्यासाठी भविष्यातील सर्व निवडणुका महा विकास आघाडी च्या नावावर लढवल्या जाव्यात असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे आता येत्या काळात त्याचा फायदा भोसलेंना मिळण्याची शक्यता आहे.

4