सिंधुदुर्ग महाविद्यालयाकडील रस्त्याचे भूमिपूजन…

381
2
Google search engine
Google search engine

बांधकाम सभापती कुशे यांच्या पाठपुराव्यातून रस्त्याचे काम मार्गी…

मालवण, ता. २४ : नगरपरिषद रस्ते अनुदानातून मंजूर झालेल्या स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याचे भूमीपूजन संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.
या रस्त्यासाठी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती गणेश कुशे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, सुदेश आचरेकर, मंदार केणी, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, बाबी जोगी, भाई कासवकर, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, ललित चव्हाण, रश्मी परुळेकर आदी उपस्थित होते.