बांद्यात उद्या श्री स्वामी समर्थांची पालखीचे आगमन

2

बांदा
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्यावतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पालखी फेरीचे आगमन बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी बांदा येथे होणार आहे.
बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात सकाळी ९ वाजता पालखीचे आगमन होईल. यावेळी पादुकांची पुजाअर्चा ,नैवेद्य व महाआरती होईल. त्यानंतर महाप्रसादास आरंभ होईल. स्थानिक भजनकर्मींची भजनसेवा होईल. सायंकाळी पालखीचे पुढे प्रस्थान होईल. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन स्वामी भक्त परिवारातर्फे करण्यात आले आहे.

4