सावंतवाडीत राज्यस्तरीय शरीरसौष्ठत्व स्पर्धा घेणार…

286
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकर;वाॅरीयर्स ग्रुपच्यावतीने रंगली,व्यायामपट्टूची स्पर्धा…

सावंतवाडी ता.२४: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना व्यायामाचे महत्व पटवून देण्यासाठी मे महिन्यापूर्वी सावंतवाडीत राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा घेण्यात येईल,त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करू,असा विश्वास माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला. नवोदित तरुणांना व्यायामाचे महत्त्व पटणे गरजेचे आहे.त्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करणे काळाची गरज आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.वाॅरीयर्स ग्रुपच्या माध्यमातून आज येथे आयोजित करण्यात आलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे उदघाटन आज झाले.यावेळी ते बोलत होते.

या प्रसंगी माजी राज्यमंत्री प्रविण भोसले,काॅग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत,युवा नेते संदेश पारकर,विक्रांत सावंत,सागर नाणोसकर,गुणाजी गावडे,अनुप नाईक,साक्षी वंजारी,हेमंत नाईक ,वैभव नाईक ,नंदू गावडे,जावेद शेख,विक्रांत हळदणकर आदी उपस्थित होते.

\