शेतक-याच्या समोर चक्क बिबटा उभा राहतो तेव्हा…

260
2
Google search engine
Google search engine

माणगाव आंबेरीतील घटना;ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण…

माणगाव/मिलिंद धुरी ता.२५: खोऱ्यातील आंबेरी गावात भावई मंदिर नजिक रस्त्यालगत असलेल्या जंगलमय परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शिवा म्हाडगूत नामक शेतकऱ्याच्या समोर अचानक भला मोठा बिबट्या उभा राहिला.ही घटना काल सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास घडली.दरम्यान हा सर्व प्रकार पाहून शिवा बिथरला,काही क्षण त्याठिकाणी तो स्तब्ध उभा राहिला,त्यानंतर बिबट्याने मागच्या पावली आपला मोर्चा वळवला. हा सर्व प्रकार लक्षात घेतात दैव बलवत्तर म्हणून शिवाचा जीव वाचला.
हा सर्व प्रकार पाहून शिवा बिथरलेल्या अवस्थेत गुरांना घेउन गावाकडे परतला त्याने घडलेला सर्व प्रकार ग्रामस्थांसह पोलीस पाटील संतोष म्हाडगुत यांच्या कानावर घातला त्यानंतर याबाबतची कल्पना वनविभागाला देण्यात आली आहे.भर वस्ती नजिक बिबट्या निदर्शनास आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.