केसरकरांचा पलटवार;राणेंचा बागुलबुवा करण्याची गरज नाही
सावंतवाडी ता.२५:आमदार असताना पाच रूपये सुध्दा आणू न शकलेले प्रमोद जठार शंभर कोटी काय आणणार,असा प्रश्न उपस्थित करीत निवडणुकीत जे पैसे वाटत फीरताहेत त्यांना रक्ताचा वास येत आहे,अशी जहरी टीका माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केली.दरम्यान या ठीकाणी येवून कोण काय करतो,कोण काय बोलतो,हे मला माहीत आहे.काही झाले तरी येथील जनता माझ्या सोबत आहे.त्यामुळे राणेंचा बागुलबुवा करण्याची गरज नाही,असेही त्यांनी सांगितले.
ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी खासदार विनायक राऊत,संजय पडते,वसंत केसरकर,विक्रांत सावंत,सागर नाणोसकर आदी उपस्थित होते.
श्री.जठार यांनी आपली नैतिकता गहाण ठेवली,प्राणेंच्या पायाला हात लावून नमस्कार केला.त्यांची पात्रता नाही,त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करणे कितपत योग्य,हे जनतेने ओळखावे मी आता काही बोलणार नाही.राणेंच्या नावाचा बागल बुवा करण्याची मला गरज नाही.जठार यांना राजकारणातले काही माहीती नाही.केंद्रातून आलेले पैसे थेट खर्च करता येत नाहीत,असे असताना ते लोकांची दिशाभूल करीत आहेत.मात्र येथील जनता त्यांच्या खोट्या पोपटपंचीला बळी पडणार नाही.असे श्री.केसरकर म्हणाले.