भरधाव डंपरची धडक बसता-बसता पादचारी वृद्ध बचावला…

680
2
Google search engine
Google search engine

निरवडेतील घटना; संतप्त ग्रामस्थांनी सर्व डंपर रोखले…

सावंतवाडी/निखिल माळकर ता.२५: भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची धडक बसता-बसता सुदैवाने एक पादचारी वृद्ध बचावला आहे.प्रसंगावधान राखून संबंधित वृद्धाने रस्त्याच्या कडेला गटारात उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला.मात्र यात त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास निरवडे-कौलकारखाना परिसरात घडली.महादेव धोंडू धुरी (७०) रा.निरवडे,असे त्यांचे नाव आहे.दरम्यान तेथील स्थानिकांनी संबंधित डंपरसह त्याठिकाणाहून वाहतूक करणारे सर्व डंपर रोखून धरले.
संबंधित डंपर कळणे येथून मायनिंग घेऊन रेडी च्या दिशेने जात होता. दरम्यान तो निरवडे-कौलकारखाना परिसरात आला असता त्याचा वाहनावरील ताबा सुटला व मोठा अनर्थ होता-होता टळला.या घटने नंतर तेथील स्थानिकांनी डंपर चालकाला चांगलेच खडसावले.
या रस्त्यावर दिवसेंदिवस मायनिंग वाहतूक करणाऱ्या डंपरची संख्या वाढली आहे.तर हे डंपर चालक या रस्त्यावरून भरधाव वेगाने डंपर हाकत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.यावेळी काका गावडे,महेंद्र गावडे,चेतन गावडे,उमाकांत गावडे,आनंद कुबल,सूर्या गावडे,सुभाष कवडे,नैनेश कावळे आदी उपस्थित होते.