Saturday, May 24, 2025
Google search engine
HomeUncategorizedभाजपा युवा मोर्च्याचे शहरअध्यक्ष कोरगावकर देणार राजीनामा...

भाजपा युवा मोर्च्याचे शहरअध्यक्ष कोरगावकर देणार राजीनामा…

हकालपट्टीच्या कारवाईची कीनार;प्रामाणिक कार्यकर्त्यांला डावलल्याचा आरोप…

सावंतवाडी ता.२५: भाजपाशी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अन्नपूर्णा कोरगावकर यांची भाजपातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केल्यानंतर त्यांचे सुपुत्र तथा भाजपचे युवा शहराध्यक्ष अखिलेश कोरगावकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांच्यासोबत त्यांचे स्नेही २५ युवा कार्यकर्ते सुद्धा आपला राजीनामा देणार आहेत.याबाबतची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी बोलताना श्री.कोरगावकर म्हणाले,जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रामाणिक कार्यकर्त्याला डावलून त्याचे खच्चीकरण केलं आहे.आम्हाला घराघरात कमळ पोचवायचे होते,मात्र ती संधी त्यांनी घालवली.त्यात प्रामाणिक असलेल्या सौ.कोरगावकर यांना पक्षातून निलंबित केल्याने येथील जनतेचा रोष आता भाजपला पत्करावा लागेल.येथील जनता आता पेटून उठली असून आपल्या लाडक्या वहिनीला भरघोस मतदान करतील आणि याठिकाणी घेतलेल्या निलंबनाचा फटका भाजपाला बसेल,असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments