कोलगाव सातेरी मंदिराचा भूमिपूजन सोहळा उत्साहात…

171
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२५: कोलगावचे ग्रामदेवत श्री देवी सातेरी पंचायनत मंदिर जिर्णोध्दाराचा शुभारंभ नुकताच देवस्थानचे मानकरी,सिमधडे आणि भाविकांच्या उपस्थिती विधिवत करण्यात आला.या मंदिराचा जिर्णोध्दार येत्या वर्षभरात पुर्ण करण्यात येणार असुन त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.
सुमारे दिडशे वर्षांपुर्वी चा मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला होता सध्या हे मंदिर जिर्ण झाल्याने सातेरी मंदिराचा कौल घेऊन या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात येत आहे . सातेरी जागृत देवस्थान असुन लाखो भाविकाचे श्रद्धास्थान आहे. या भाविक भक्तांच्या सहकार्याने सुमारे 1 कोटी 13 लाख रूपायचा आराखडा असलेल्या या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. या मंदिराचा मुळ ढाचा तसाच ठेऊन गाभारा कळस चौखांबा आणि सभामंडप या टप्प्यात बांधकाम करण्यात येणार आहे. या जिर्णोध्दार शुभऱभासाठी कुळघराकडुन सवाद्य पालखी सह तरंग काठी मंदिराकडे आणण्यात आली होती यावेळी प्रथम पुजा अभिषेक झाल्यानंतर या देवस्थानच्या देवताच्या हस्ते मंदिराची कौले काढण्यात आली. त्यानंतर या देवस्थानच्या कमिटीचे अध्यक्ष चंदन धुरी याच्या हस्ते जिर्णोध्दाराचा शुभारंभ करण्यात आला
या मंदिराचे बांधकाम नियोजित वेळेत पुर्ण होण्यासाठी भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यासाठी सढळ हस्ते मदत करावी असे आवाहन स्थानिक देवस्थान कमिटीचे अध्यक्ष चंदन धुरी आणि देवस्थानच्या सर्व मानकरी यानी केले आहे.

\