परबवाडा येथील मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ले : ता.२५ रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन, इनरव्हील क्लब, लोकनेते अॅड.दत्ता पाटील मेडिकल कॉलेज, गद्रे नेत्र रुग्णालय, रामेश्वर महिला ग्रामसंघ परबवाडा व ग्रामपंचायत परबवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत संगणकीय नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा १५९ जणांनी लाभ घेतला.
परबवाडा ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन सरपंच विष्णू उर्फ पप्पू परब यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेश घाटवळ, इनरव्हील क्लब अध्यक्षा वृंदा गवंडळकर, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्य डॉ.पूजा कर्पे, गद्रे नेत्र रुग्णालयाचे उदय दाभोळकर, उपसभापती स्मिता दामले, रोट्रक्ट प्रेसिडेंट हेमंत गावडे, उसरपंच संजय मळगांवकर, तंटामुक्तीचे सुनिल परब, मुख्याध्यापिका रॉड्रीक्स, ग्रामसेवक बोर्डेकर, तालुका समन्वयक सागर आवळेगांवकर, प्रभाग समन्वयक पूजा वाडकर, सीआरपी गौरी सावंत, ग्रामसंघ अध्यक्ष सुवर्णा सावंत, ग्रामपंचायत सदस्य कृतिका साटेलकर, संतोष सावंत आदी उपस्थित होते. परबवाडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासाबाबत योजना गावात आणण्यासाठी सतत कर्यरत असणारा युवा सरपंच पप्पू परब याचा शाल व श्रीफळ देऊन रोटरी क्लबतर्फे सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.आनंद बांदेकर यांनी, स्वागत प्रा.सदाशिव भेंडवडे यांनी तर आभार इनरव्हील क्लबच्या सचिव गौरी मराठे यांनी मानले.