राजू मसुरकरांचा आरोप;विकास सावंतांची पक्षाच्या नेतृत्वाकडे करणार तक्रार…
सावंतवाडी ता.२५: आपले पुत्र विक्रांत सावंत यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी किंवा पुढच्या विधानसभा निवडणुकीत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांचा राजकीय वारसदार म्हणून संधी मिळेल,या आशेवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष काँग्रेसच्या विरोधात जाऊन काम करीत आहेत,असा आरोप काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर यांनी केला आहे.काँग्रेसचे उमेदवार हे दिलीप नार्वेकर आहेत,मात्र त्यांना खाली खेचण्याचे काम महाविकास आघाडीच्या नावाखाली काही नेत्याकडून सुरू आहे.मात्र कितीही विरोध झाला तरी नार्वेकर हे शंभर टक्के नगराध्यक्ष म्हणून निवडून येतील,असा विश्वासही श्री.मसुरकर यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या विरोधात राहून केसरकरांना सहकार्य करणाऱ्या सावंत यांची पक्षश्रेष्ठींकडे आपण तक्रार करणार आहोत.असेही यावेळी मसुरकर म्हणाले.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.