बांदा/प्रतिनिधी
रोजगारा गारासाठी कलकत्ता हुन आलेल्या साैरभ समिर अधिकारी (वय २०) या तरुणाने रोणापाल येथील राहत्या झोपडीपासुन एक किलोमिटर असलेल्या पुरणी भागात झाडाला दोरी बाधुन गळफ़ास लावुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकिस आली.
रोणापाल (पुरणी) येथुन जाणार्या कालव्याचे काम सुरु आहे. या कामसाठी मुकादमाने कलकत्याहुन १२ कामगार आणले होते. मंगळवारी मयत साैरभ याने आपण गावाला जातो असे सांगितले. त्यावेळी मुकादमाने बुधवारी दुपारनंतर कामाचा हिशोब करतो त्यानंतर तुम्ही गावी जा असे सांगितले . परंतु मंगळवारी गावी जाणार असा हट्ट त्याने पकडला होता. बुधवारी सकाळी तेथील स्थानिक व्यक्तीने पुरणी येथे एक कामगार झाडाला गळफास लावल्याच्या स्थितित असल्याचे सांगितले. त्यानंतर सोबत असलेल्या दोघांनी जावुन खातरजमा केली असता तो साैरभ असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सहकारी कामगार नारायण पाल यांनी दिली.
याची खबर त्यांनी मुकादमाला दिली व मुकादमाने बांदा पोलिसांना कळविले.बांदा पोलिसांनी घटना स्थळी जावुन पंच नामा केला. व मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंदात शवविच्छेदनास आणण्या त आला.
दरम्यान बांदा पोलिसांत संपर्क सादल्याने पोलिस निरिक्षक अनिल जाधव यांनी आत्महत्या केल्याचे कारण अजून स्पष्ट न झाल्याचे सांगितले.
फोटो:-
रोणापाल येथे मजुराची गळफसद्वारे आत्महत्या
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES