शंभर कोटी आणणे, म्हणजे शंभर रूपये आणण्यासारखे नव्हे…

184
2

विनायक राऊतांचा पलटवार;जठारांनी आपली पोपटपंची बंद करावी…

सावंतवाडी ता.२५:भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांना शंभर कोटी रुपये म्हणजे शंभर रुपये दिसतात का ?,असा प्रश्न आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत यांनी केला.जठार यांनी पोपटपंची बंद करावी,असेही यावेळी श्री.राऊत यांनी सांगितले.
येथील पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या श्रीधर आपारमेंट मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी दीपक केसरकर,जिल्हाप्रमुख संजय पडते,विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत ,सागर नाणोसकर,शब्बीर मणियार आदी उपस्थित होते.
श्री.राऊत म्हणाले, काही जणांनी येथे आपले धंदे सुरू केले आहेत.विकार आणि विकास यामधला फरक येथील सावंतवाडीकर जाणून आहे.विकासाकडे झेपावणारे शहर म्हणून सावंतवाडी चे वैशिष्ट्य आहे .त्यामुळे कोणीही कितीही येऊन पोपटपंची केली तरी या शहराचा शाश्वत विकास हा केसरकरामुळेच झाला हे कोणीही नाकारणार नाही,राज्यात झालेल्या महा विकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणाकडे आपले घर म्हणून पाहत आहेत.त्यामुळे सावंतवाडी ते चिपळूण या शहरांचा कायापालट करण्यासाठी तेथील विकासाला गती देण्‍यासाठी ते लवकरच पाऊल उचलणार आहेत.
श्री.राऊत पुढे म्हणाले, प्रमोद जठार यांच्यासारखा पोपटपंची करणारा माणूस आपण पाहिलेला नाही.सावंतवाडी शहरासाठी १०० कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन ते आज येथील जनतेला देत आहेत.मात्र त्यांच्या निधीची गरज सावंतवाडी करांना नाही तर केसरकर यांनी आणलेला निधी त्यांनी आधी पहावा १०० कोटी रुपये आणायला केंद्रातील सरकार तरी टिकले पाहिजे अशी खिल्ली त्यांनी उडवली.
राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देताना कर्जमाफीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मात्र यापूर्वीच्या सरकारने लादलेल्या अटी नियम पाहता भीक नको पण कुत्रा आवर अशी परिस्थिती होती.आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे मात्र असे असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यात नियमित कर्जपुरवठा करणाऱ्यांची संख्या जास्त आहे याबाबतही शासनाने दिलासादायक निर्णय घेतला असून कर्ज भरणाऱ्या कर्जदारांना सूट देण्यात येणार आहे त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदाराने नाराज होण्याची गरज नाही.
जनशताब्दी एक्सप्रेसला कायमस्वरूपी थांबा देण्याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत येथील प्रवासी वर्गाला दिलेली ही देणगी आम्ही कायम टिकणार असून याबाबत लवकरच रेल्वेमंत्र्यांची चर्चा करण्यात येणार आहे तसेच इतर स्टेशनवर मिळत असलेली टिकीट सुविधाही याठिकाणी मिळावी याबाबतही आमच्या प्रयत्न राहणार आहे.

4