पंचायत समिती सभापती निवड प्रक्रिया उद्या…
मुदतवाढ नाहीच, उद्याच सर्वांना पदभार सोपविला जाणार ; महसूल विभागाकडून स्पष्ट…
मालवण, ता. २५ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापती पदाची निवडणूक प्रक्रिया उद्या होत असून या प्रक्रियेनंतर तत्काळ नूतन सभापती, उपसभापती यांना त्याच दिवशी पदभार दिला जाणार आहे अशी माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सभापती, उपसभापती यांना उद्याच पायउतार व्हावे लागणार आहे.
जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापती यांची निवड प्रक्रिया उद्या होत आहे. यात शासनाने दोन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. यात या दोन महिन्यांच्या कालावधीत पंचायत समिती सभापती, उपसभापती यांची निवड करण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यात सर्व पंचायत समिती सभापती यांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्यांच्या निवड प्रक्रियेची तारीख जिल्हाधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली. यात शासनाकडून मुदतवाढीचे कोणतेही निर्देश जिल्हा प्रशासनास प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे उद्या पंचायत समिती सभापती, उपसभापती या पदांची निवड प्रक्रिया होणार आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया कार्यक्रम यापूर्वीच जाहीर केल्याने उद्या पंचायत समिती सभापती, उपसभापती यांची निवड निश्चित होणार असून त्यांना तत्काळ पदभार सोपविला जाणार आहे.
शासनाच्या मुदतवाढ अधिसूचनेची कोणतीही माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेली नाही. त्यामुळे उद्या सभापती, उपसभापती निवडीनंतर त्यांना तत्काळ पदभार सोपविला जाणार आहे. अशी माहिती तहसीलदार अजय पाटणे यांनी दिली.