सावंतवाडी-कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये ग्रंथालय उभारण्याचा मानस…

149
2
Google search engine
Google search engine

एज्युकेशन सोसायटीचा पुढाकार;माजी विद्यार्थ्यांकडून”एक पुस्तक शाळेसाठी” उपक्रम…

सावंतवाडी ता.२६: येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये नव्या स्वरूपात सुसज्ज ग्रंथालय साकारण्याचा संकल्प आहे.त्या करीता ‘एक पुस्तक शाळेसाठी’ ही योजना सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीने माजी विद्यार्थी महामेळाव्याच्या निमित्ताने जाहिर केली आहे.तसेच माजी विद्यार्थ्यांना शाळेसाठी किमान एक पुस्तक देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
२८ व २९ डिसेंबर २०१९ च्या माजी विद्यार्थी महामेळाव्याच्या निमित्ताने कळसुलकर इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत नव्या स्वरूपात ग्रंथालय सुरू होत आहे.माजी विश्वस्त कै.रमेश चिटणीससरांच्या नावाने हे ग्रंथालय सुरू होत आहे.शाळेचे आता पयँत अंदाजे वीस हजार माजी विद्यार्थी आहेत.या माजी विद्यार्थी यांनी प्रत्येकी एक जरी पुस्तक शाळेसाठी दिले तरी किमान वीस हजार पुस्तकांनी ग्रंथालय सम़ध्द होईल.माजी विद्यार्थी व ग्रंथप्रेमी नागरिक आल्या प्रियजनांच्या नावाने पुस्तक देणे, वाढदिवसा दिवशी शाळेस पुस्तक देणे, आपल्या कडील जुना पण सुस्थितीतील पुस्तक संग्रह शाळेला देणे अशा विविध स्वरूपात शाळेच्या ग्रंथालयास मदत करू शकतात.
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संचालक सौ.राजश्री टिपणीस-विचारे यासंबधीचे व्यवस्थापन पाहत आहेत. मुंबई येथील माजी विद्यार्थी ग्रंथप्रेमींना पुस्तक द्यायचे असेल त्यांनी ओंकार तुळसुलकर (9423301762)यांचेशी सायंकाळी 6 नंतर संपर्क करावा.आपले एक पुस्तक देखील शाळेसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त माजी विद्यार्थी, पालक, ग्रंथप्रेमी नागरिकांनी ‘एक पुस्तक शाळेसाठी’ देण्याचे आवाहन सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, सचिव डाँ.प्रसाद नावेँकर यांनी केले आहे.