कणकवली पंचायत समिती सभापतीपदी दिलीप तळेकर तर उपसभापती पदी दिव्या पेडणेकर…

226
2

कणकवली, ता.२६: पंचायत समितीच्या सभापतिपदी दिलीप तळेकर तर उपसभापती पदी दिव्या पेडणेकर यांची नावे निश्‍चित झाली आहेत. सायंकाळी तीन वाजता सभापती आणि उपसभापती निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.

कणकवली पंचायत समितीचे सर्व १६ सदस्य राणे समर्थक आहेत. त्यामुळे सभापती आणि उपसभापती पदी कोणाची नावे निश्चित होतात याबाबत उत्सुकता होती. आमदार नितेश राणे यांनी सभापतीपदी दिलीप तळेकर तर उपसभापतिपदी दिव्या पेडणेकर यांना संधी दिली आहे.

4