उपसभापती पदासाठी राजू परुळेकर यांचे नामनिर्देशन पत्र दाखल ; अधिकृत घोषणा तीन वाजता…
मालवण, ता. २६ : येथील पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अजिंक्य पाताडे तर उपसभापती पदासाठी सतीश ऊर्फ राजू परुळेकर यांची नावे निश्चित झाली आहेत. निवडीची अधिकृत घोषणा दुपारी तीन वाजल्यानंतर केली जाणार आहे.
पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जाती साठी आरक्षित झाले आहे. या पदासाठी सुकळवाड पंचायत समिती मतदार संघाचे सदस्य अजिंक्य पाताडे हे एकमेव सदस्य असल्याने त्यांची या पदावर निवड निश्चित झाली आहे. तर उपसभापती पदासाठी आडवली-मालडी पंचायत समिती मतदार संघाचे सदस्य सतीश ऊर्फ राजू परुळेकर यांचे नाव निश्चित करण्यात आले. या दोन्ही सदस्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी सुहास खडपकर यांच्याकडे नामनिर्देशन पत्र सादर केले. यावेळी सभापती सोनाली कोदे, भाजप तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, उपसभापती अशोक बागवे, मनीषा वराडकर, महेश मांजरेकर, सुभाष लाड आदी उपस्थित होते.