सावंतवाडीत भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न …

2

पंचायत समिती सभापती निवडणूक;धुरी की गोवेकर काही वेळात होणार स्पष्ट

सावंतवाडी ता.२६: येथील पंचायत समितीत भाजपचे व पर्यायाने राणे समर्थकांचे वारू रोखण्यासाठी काँग्रेस कडून भूमिका घेण्यात आली आहे.त्याठिकाणी काँग्रेसच्या मनीषा गोवेकर यांना सभापतीपदी तर उपसभापती म्हणून शिवसेनेच्या मेघशाम काजरेकर यांना संधी देण्यात आली आहे.दुसरीकडे संख्याबळाच्या जीवावर सभापती पदासाठी भाजपाकडून मानसी धुरी यांच्यासह उपसभापती म्हणून बांद्यातील शितल राऊळ यांनी आपला अर्ज भरला आहे.त्यामुळे सभापती उपसभापतीची संधी नेमकी कोणाला मिळते,यात भाजपला यश मिळते का? महाविकास आघाडीला यश येते,हे चित्र आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे.

काँग्रेस सह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जाहीर केल्यानुसार सर्व पंचायत समिती सदस्यांना अखेर व्हीप बजावण्यात आले असले तरी राणेसमर्थक भाजप गटाकडून याठिकाणी सभापतीपदासाठी धुरी तर उपसभापतीसाठी राऊळ यांचा अर्ज भरण्यात आला आहे.भाजपाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीने काँग्रेसच्या मनीषा गोवेकर यांना व शिवसेनेच्या काजरेकर यांना संधी दिली आहे.त्यामुळे या बेरजेच्या गणितात नेमकी संधी कोणाला मिळते हे काही वेळा स्पष्ट होणार.

4