घरोघरी प्रचारावर भर;राणेंचे वारू रोखणे ठरणार प्रतिष्ठेचा मुद्दा
सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.२६: येथील पालिका निवडणुकीच्या निमित्ताने नगराध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत नारायण राणे यांचे वारू रोखण्यासाठी माजी पालकमंत्री तथा शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर स्वतः आखाड्यात उतरले आहेत.विशेष म्हणजे राज्यात मंत्रीपदाची शर्यत सुरू असताना केसरकर मात्र अगदी स्वतःच्या निवडणुकी सारखे घरोघरी फिरून ते बाबू कुडतरकर यांना निवडून द्या,असे आवाहन करत आहेत.
नगराध्यक्षपदाची निवडणूकीत सहा उमेदवार असले तरी ही निवडणूक राणेँविरुद्ध केसरकर अशीच रंगली आहे.केसरकर यांच्या ताब्यात असलेली पालिका आपल्या ताब्यात घेण्यासाठी राणे समर्थकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहेत.त्यासाठी खुद्द आमदार नितेश राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण,राजन तेली,प्रमोद जठार आदी नेते संजू परब यांच्या मदतीसाठी उतरले आहेत.सत्ताधारी व विरोधकांचे एकमेकांवर आरोपाच्या फैरी झाडल्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.त्यामुळे दोन्ही बाजूने सावंतवाडी ताब्यात घेणे हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.इकडे भाजपचे नेते या ठिकाणी ठाण मांडून बसले असताना केसरकरांनी मंत्रिपदाची शर्यत सोडून याठिकाणी कालपासून शत्रू ठेवला आहे. घरोघरी जाऊन बाबू कुडतरकर यांना बहुमताने निवडून द्या,असे आवाहन व महाविकास आघाडीचे पदाधिकारी करत आहेत.