मुस्लिम बांधवांसह बहुजन समाज एकत्र;जिल्हाधिका-याना दिले निवेदन
ओरोस ता.२६: सीएए कायदा मागे घ्या.. रिझेक्ट एनआरसी, रिझेक्ट सीएए.. हिन्दुस्थान जिंदाबाद.. संविधान बचाव, भारत बचाव… अशा घोषणा देत भारतीय सार्वभौमतवाला बाधा पोहोचवीणाचा संशय असलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रिय नागरिकत्व नोंद (एनआरसी) या कायद्यांना विरोध करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुस्लिम व बहुजन समाजच्यावतीने गुरुवारी ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी “संविधान बचाव रॅली” काढण्यात आली. तसेच या अन्यायकारक कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येवू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी शेकडोंच्या संख्येने नागरीक सहभागी झाले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम समाज आणि बहुजन समाजाच्या वतीने ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी “संविधान बचाव रॅली” काढण्यात आली. या रॅलीला सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम समाज, बहुजन क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस या राजकीय व समाज संघटनांचा पाठिंबा होता. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम आणि बहुजन समाजाचे कौसर खान, सिराज शहा, सरफराज नाईक, अल्ताफ खान, अमित नांदगावकर, आबा मुंज, काका कुडाळकर, समीर बेग, अन्वर खान तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रीय कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत, प्रवीण भोसले यांच्यासह ८०० हुन अधिक मुस्लिम आणि बहुजन समाज बांधव उपस्थित होते.