सावंतवाडीची पंचायत समिती अखेर राणेंच्याच ताब्यात…

2

काॅग्रेसचा व्हीप धुडकावला;सभापतीपदी धुरी तर उपसभापती राऊळ…

सावंतवाडी/शुभम धुरी ता.२६: काँग्रेसकडून बजावण्यात आलेला व्हीप धुडकावत अखेर सावंतवाडी पंचायत समितीचे सभापतीपद राणेंच्याच ताब्यात राहीले.त्या विरुद्ध हात उचावून मतदान घेण्यात आले.यात पाच विरूध्द तेरा असे मतदान होवून सभापती म्हणून समर्थक मानसी धुरी तर उपसभापती म्हणून भाजपाच्या शितल राऊळ यांना संधी मिळाली.
काँग्रेसच्या वतीने बजावण्यात आलेल्या व्हीपमध्ये काँग्रेससह महा विकास आघाडी अशी दोन्ही नावांचा समावेश असल्याचे कारण पुढे करून राणे समर्थकांनी हा व्हीप धुडकावून लावला .त्यामुळे त्या ठिकाणी सभापती पदासाठी काँग्रेसकडून उभ्या असलेल्या मनीषा गोवेकर यांच्यासह शिवसेनेच्या मेघशाम काजरेकर यांना अपयश आले. दरम्यान या सर्व मोर्चेबांधणी नंतरसुद्धा भाजपचा सभापती बसल्यामुळे राणेसमर्थक व भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला नारायण राणे आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी पंचायत समिती अहवाल गजबजून गेला दरम्यान नवनिर्वाचित सभापतींचे उपसभापती यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती

4

4