वेंगुर्ले : ता.२६
वेंगुर्ले-उभादांडा-बागायत समुद्रात आंघोळीसाठी उतरलेला म्हापसा-गोवा येथील युवक पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून त्याचा मृत्यू झाला.ही घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.अब्दुल रजाक डूनडशी असे त्याचे नाव आहे.अब्दुल हा गाईडने काम करत होता.
आज सकाळी गोवा येथून एका विदेशी पर्यटकाला घेऊन वेंगुर्ले येथे आला होता. वेंगुर्ले फिरत असताना त्याने समुद्राची सफर करण्यासाठी सोबत आणलेल्या विदेशी पर्यटकाला समुद्र स्नानासाठी उभादांडा-बागायत समुद्र किनारी आणले. तेथील वातावरणाचा आनंद घेतल्या नंतर दोघेही समुद्राच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरले. मात्र अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेचा अंदाज न आल्याने अब्दुल याचे पाय वर उचलले गेले आणि तो पाण्याच्या प्रवाहा बरोबर समुद्रात बुडाला. काही वेळा नंतर अब्दुल याचा मृतदेह समुद्र किनारी दिसून आला. या दुर्घटने बाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी घटनास्थळी धाव घेतली. वेंगुर्ले पोलीस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.